Monday, November 14, 2011

१९ नोव्हे ला राज्यव्यापी रास्ता रोको व सेवाग्राम ते नागपूर पदयात्रा - विधानभवनावर धडक


१९ नोव्हे ला राज्यव्यापी रास्ता रोको व सेवाग्राम ते नागपूर पदयात्रा - विधानभवनावर धडक

shetkari sanghatana

                                                   प्रसिद्धीपत्रक
                                                                                                           दि. १६ नोव्हेंबर २०११

         १९ नोव्हेंबरला राज्यव्यापी रास्तारोको आंदोलन

कापसाची सहा हजार रुपये, सोयाबिनची तीन हजार रुपये, तुरीची पाच हजार रुपये आणि धानाची हजार सहाशे रुपये आधारभूत किंमत जाहीर करावी, या मागणीसाठी १९ नोव्हेंबरला राज्यव्यापी एक तासाचे लाक्षणिक स्वरुपाचे रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवि देवांग यांनी केली आहे.
हिंगणघाट येथील कापूस व धान उत्पादक परिषदेने संमत केलेल्या मागण्यांची शासनाने दखल घेतली नाही. एक तासाचे रेलरोको इशारा आंदोलन करण्यात आले पण सरकारने त्याकडे कानाडोळा केला आणि शेतकर्‍यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गंभीरतेने पावले उचलली नाही. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही अशी भिष्मप्रतिज्ञाच शासनाने घेतली असल्याचे यावरून दिसून येत आहे.  शासनाला शेतक र्‍यांची मुकभाषा अजिबातच कळत नसल्याने आता नाईलाजाने शेतकरी संघटनेला “आरपार की लढाई” लढण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे.
गेल्यावर्षी अंशत: निर्यातीमुळे कापसाला सरासरी रू. सहा हजार सहाशे प्रति क्विंटल भाव मिळाला. फ़ेब्रुवारी महिण्यात केंद्र सरकारने निर्यातबंदी लादल्याने देशांतर्गत बाजारपेठेत कापसाचे भाव गडगडले. आजच्या कापसाच्या दुरावस्थेला सरकारचे निर्यातधोरणच कारणीभूत आहे.
थकित वीजबिलापोटी शेतातील विजपुरवठा खंडीत करणे थांबवावे, कापूस निर्यातीवरील सर्व बंधने हटवावी व कापूस बाजार नियंत्रणमुक्त करावा,  कापसाची आधारभूत किंमत कापूस पणण महासंघाच्या शिफारशीप्रमाणे रु. ६०००/- जाहीर करावी, बिगरबासमती तांदळावरील निर्यातबंदी कायमस्वरुपी हटविण्यात यावी, संपूर्ण शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती, सर्व शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळावा, ग्रामिण भागातील लोडशेडींग बंद करण्यात यावे, आघाडी सरकारच्या जाहिरनाम्यातील आश्वासनाप्रमाणे वीज बिलातून शेतकर्‍यांची संपूर्ण मुक्तता करण्यात यावी इत्यादी प्रश्नाची कायमची सोडवणूक करून घेण्यासाठी आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वरील मागण्यांचा कायमचा सोक्षमोक्ष लावून घेण्यासाठी शेतकरी संघटनेद्वारा विदर्भ, खानदेश आणि मराठवाड्यात तिव्र आंदोलन करण्यात येणार आहे.

आंदोलनाचा पहिला टप्पा :  कापसाची ३१५०/- रू भावाने सीसीआय, नाफ़ेड अथवा कापूस पणन महासंघाद्वारे सरकारी खरेदी केंद्रे सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. कापसाला खाजगी व्यापारी ४१००/- ते ४४००/- भाव देत असताना सरकारने ३१५०/- किंवा ३३००/- रू भावाने खरेदी करण्याची भाषा अत्यंत लांच्छणीय असून त्यामुळे कापसाचे भाव आणखीच कोसळण्याची शक्यता असल्यामुळे सरकारच्या या प्रयत्नांचा शेतकरी संघटना धिक्कार करीत आहे. कुठल्याही स्थितीत ६०००/- रुपयापेक्षा कमी भावाने सरकारी खरेदी केंद्रे सुरू करू दिली जाणार नाही. सरकारने बळजबरीने ३३००/- रू. भावाने खरेदी केंद्रे सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याचा वापर करून असा प्रयत्न हाणून पाडावा, असा शेतकरी संघटना आदेश देत आहे.

आंदोलनाचा दुसरा टप्पा :  १९ नोव्हेंबरला राज्यव्यापी एक तासाचे लाक्षणिक स्वरुपाचे रास्तारोको आंदोलन करण्यात येईल.

आंदोलनाचा तिसरा टप्पा :   ५ डिसेंबर ते १२ डिसेंबर सेवाग्राम ते नागपूर पदयात्रा. १२ डिसेंबरपासून नागपूर विधान भवनासमोर ठिय्या आंदोलन.

आंदोलनात शेतकर्‍यांनी सक्रिय सहभाग नोंदवून आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवि देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष एड वामनराव चटप, माजी आमदार सरोज काशीकर, शैलजा देशपांडे, अनिल घनवट, गुणवंत पाटील, कडू आप्पा पाटील, प्रकाश लाहोटी, कैलास तंवर यांनी केले असल्याची माहीती गंगाधर मुटे, प्रसिद्धी प्रमुख महाराष्ट्र , यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.



                                                                                                                 गंगाधर मुटे

                                                                                                                   प्रसिद्धी प्रमुख
                                                                                                महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना, तथा
                                                                                                शेतकरी संघटना, वर्धा जिल्हाध्यक्ष
--------------------------------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी भेट द्या.

Monday, May 23, 2011

बळीराजा-निमंत्रण


निमंत्रण - पत्रिका  

एक नवे संकेतस्थळ

बळीराजा डॉट कॉम


आपण येथे वाचू शकता, 
मराठीत लिहू शकता, 
प्रतिसाद देऊ शकता,
लेख लिहू शकता,
काव्य लिहू शकता,
चर्चेत भाग घेऊ शकता, 
नवीन चर्चा सुरू करू शकता
या, एक वेळ अवश्य भेट द्या.
सदस्य व्हा.....!
*  *  *
या मित्रांनो,
काळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो,
उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो,
हक्कासाठी लढणार्‍यांनो,
लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो,
स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो,
नव्या युगाच्या निर्मात्यांनो,
या जरासे खरडू काही,
काळ्याआईविषयी बोलू काही.
* * *    www.baliraja.com     * * *

Sunday, April 24, 2011

माधवराव मोरे पंच्याहत्तरी




प्रेषक :  निवृत्ती करडक.
-------------------------------------------------------------------------------------------------

Wednesday, April 20, 2011

पिंपळगाव कार्यकारणी बैठक

कार्यकारणी बैठक 

२२ एप्रिल २०११ .

पिंपळगाव येथे.


:संपर्क:


Mr Kardak Nivrutti Baburao.

shetkari sanghatana
Kurnoli tal.Dindori  [Nashik]
................................................

Friday, April 15, 2011

शेतकरी संघटनेतर्फे घटनेच्या प्रतिकात्मक प्रतीचे दहन

शेतकरी संघटनेतर्फे घटनेच्या प्रतिकात्मक प्रतीचे दहन


धुळे, दि.१४.०४.२०११

        भारतीय राज्य घटना नव्या मनुस्मृतीचे रुप आहे. त्यातून शेतकर्‍यावर अन्याय झालेला आहे. असा आरोप करीत शेतकरी संघटनेतर्फे राज्य घटनेच्या परिशिष्ठ 9 च्या प्रतिचे प्रतिकात्म दहन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष रवी देवांग यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. शेतकरी संघटनेतर्फे सकाळी 11 वाजेच्या सुमारास परिशिष्ट 9 च्या प्रतीचे दहन करण्यात आले.
                शेतकर्‍यांना कुठलाही लाभ मिळत नाही. याचे हेच कारण असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान पोलिसांनी या आंदोलन प्रकरणी 21 शेतकर्‍यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक करुन त्यांची सुटका केली. घटनेतील पहिल्या दुरुस्ती (1952) अन्वये परिशिष्ट (9) नुसार शेतकर्‍यांना मालमत्ता संपादन करण्याचा मुलभूत अधिकार नाकारला आहे. मालमत्तेच्या व्यवहारांवर राज्यसत्तेचे नियंत्रण आले. शेतकरी नाममात्र मालक ठरला. घटनेतील दुरुस्ती (1955) अन्वये जीवनावश्यक वस्तु कायदा लादून शेतकर्‍यांच्या नैसर्गिक बाजारपेठांमध्ये हस्तक्षेप करुन, मालाचा भाव ठरविण्याचे स्वातंत्र शेतकर्‍यांना नाकारले आहे. त्यामुळे शेतकरी कायम कर्जबाजारी झाला. औद्योगिक विकास नियंत्रण कायद्याने (1951) लायसन्स परमीट कोटा राज्य आले. त्यामुळे उद्योजकतेच्या स्वातंत्र्यावर घाला येवून नोकरशाही व पुढारी यांचा भ्रष्टाचार बोकाळला व अण्णा हजारेंना खालीपिली आंदोलन करावे लागले. वहातूक नियंत्रण कायदा (1939) व फेरचरना (1988) द्वारे प्रवासी वहातुकीवर नियंत्रण आले. त्यामुळे पोलिसांना हप्ता वसुलीस रान मोकळे झाले. ही घटनाच भ्रष्टाचाराची जननी आहे.
             नाफेड व कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यांमुळे लायसन्स धारक व्यापारी व मार्केट कमिटीचे पुढारी यांनी अब्जावधी रुपये कमावले. शेतकर्‍यांला गरीब, कर्जबाजारी व आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. जे निर्णय शेतकरी, उद्योजक, व्यापारी यांनी घ्यायचे ते दिल्लीतील पुढारी व नोकरशहा घेवू लागलेत. घटना दुरुस्ती (1976) अन्वये उदारमतवादी घटना समाजवादी करण्यात आली. हा बदल देशात आणीबाणी लागू असतांना केला. तो मोकळ्या वातावरणात केला नाही. भारतीय खाद्यान्न महामंडळ कायदा (1962) अन्वये घटनेने शेती मालाच्या किंमती पाडण्याचा कायदेशीर आधार देवुन गरीबी निर्माण करण्याचा कायखाना गेली साठ वर्षे अखंडपणे सुरु आहे. तेही या घटनेमुळेच. ही घटना खून केलेल्या खुन्यासही तुरुंगात व्यक्ति स्वातंत्र्याची जपणूक करीत आत्मसन्मान देते, मात्र शेतकरी, उद्योजक यांना गुन्हेगार ठरविते. या देशाला युगप्रवर्तक दिशा देणार्‍या ऐतिहासिक आंदोलनाला देशभक्त नागरिकांनी आशिर्वाद द्यावा, अशी विनंती करतो, असे देवांग यांनी म्हटले आहे.
           घटनेच्या परिशिष्टातील नऊ प्रमुख कारणांमुळे आज दि. 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर स्मृतीदिनी ही अन्यायकारक घटना नवमनुस्मृतीरुपी घटना प्रतीक रुपाने जाळून टाकत आहे. असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. याप्रसंगी रवी देवांग यांच्या सोबत बळीराज्य संघटनेचे धुळे विभाग अध्यक्ष शांतूभाई पटेल, जळगाव व नाशिकचे अध्यक्ष कडूअप्पा पाटील, जगन्नाथ राजपूत गणेशपूर, ता. साक्री, मनोहर रामचंद्र पाटील कलमाडी, ता. शिंदखेडा, भटू तात्या अकलाडे देगाव, ता. साक्री, प्रकाश सिताराम पाटील तालुकाध्यक्ष धुळे, आत्माराम बळीराम पाटील कापडणे ता. धुळे, जयवंत यशवंत पाटील कापडणे ता. धुळे, माधव गंगाराम भदाणे उबर्टी ता. साक्री, भास्कर निंबा काकुस्ते शेनपूर ता. साक्री, शांताराम चिंधू गांगुर्डे देगाव ता. साक्री, दत्ताजीराव माधवराव बेडसे छडवेल कोर्डे ता.साक्री, धवळू पुंडलिक गांगुर्डे, श्रीराम गंगाराम ठाकरे, सजन कोंडाजी बहीरम, नारायण देवचंद देसले सर्व रा. देगाव ता. साक्री, पोपटराव शिवराम देवरे धमनार ता. साक्री, भिका खुशाल जाधव शेवाळी ता. साक्री, शिवाजी कृष्णा पाटील कापडणे ता. धुळे, गुलाबसिंग रघुवंशी सार्वे ता. शिंदखेडा आदी उपस्थित होते.

                                                                     Mr: Kardak Nivrutti Baburao.
                                                                          shetkari sanghatana
                                                                     Kurnoli tal.Dindori  [Nashik]

Friday, April 1, 2011

Fwd: स्टार माझा TV




नमस्कार.

                 स्टार माझा TV द्वारा नोव्हेंबर-डिसेंबर २०१० मध्ये ब्लॉग माझा-३ या ब्लॉग स्पर्धेचे आयोजन केले होते. 
या स्पर्धेमध्ये जगाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी उत्स्फ़ुर्तपणे भाग घेतला होता. या स्पर्धेचे निकाल जाहिर 
झाल्यानंतर २७ डिसेंबर २०१० रोजी स्टार माझाच्या मुंबई येथील स्टुडियोमध्ये बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला.

                   विजेत्यांच्या यादीत माझ्याही ब्लॉगचा समावेश असल्याने यानिमित्ताने मलाही माझे मनोगत व्यक्त 
करता आले. माझा-३ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याचा समरंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे स्टार माझा TV 
वर दिनांक २७-०३-२०११ रोजी सकाळी ९ ते १० आणि दुपारी २ ते ३ वाजता प्रक्षेपण करण्यात आले.
                आपण टिव्हीवर कार्यक्रम बघितलाच असेल. बघितला नसेल तर प्रसारणाचे व्हिडीयो रेकॉडिंग पाहण्याकरीता
खालील लिंकवर क्लिक करून माझ्या ब्लॉगला भेट द्या.

आपला प्रतिसाद नोंदवला तर आनंदच होईल.


Thumbnail

--
आपला स्नेहांकित,
    गंगाधर मुटे
.........



--
आपला स्नेहांकित,
    गंगाधर मुटे
.........

  Gangadhar Mute

Arvi Chhoti - 442307
Tah - Hinganghat
Distt - Wardha ( M.S )
*  *  *  *
          :E-mail:
gangadharmute@gmail.com
            
                 : Web :
     रानमोगरा - एक वांगमय शेती
http://gangadharmute.wordpress.com


Monday, February 14, 2011

सातबारा कोरा करण्याची गरज

शेतीवरील सातबारा कोरा करण्याची गरज -चटप

(चंद्रपूर, ९ फेब्रुवारी)
                      शेतीवरील सर्व थकित कर्ज, कर व वीज बिल कायमचे संपून त्यांचा सातबारा बोजा विरहित कोरा करण्याची आणि त्यांची बाजारात व समाजात पत तयार करण्याची नितांत गरज आहे असे प्रतिपादन स्वतंत्र भारत पक्षाचे प्रांताध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केले. कोरपना तालुक्यातील आवाळपूर येथे शेतकरी संघटनेद्वारे आयोजित नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि सेवा सहकारी सोसायटीच्या पदाधिकारी व संचालकांच्या सत्कार सोहोळय़ात ते बोलत होते. यावेळी पूर्व विदर्भ शेतकरी संघटना बळीराज्य प्रमुख मधुकर हरणे, स्वभाप अध्यक्ष प्राचार्य अनिल ठाकूरवार, प्रभाकर दिवे, प्रभाकर ढवस, प्रवीण गुंडावार, संजय मुसळे, बंडू माणूसमारे, यादव चटप, मारोती लोहे, मुमताज अली, गणपत काळे, संतोष पटकोटवार, विजय आगलावे, दिलीप आस्वले, यादव पवार, अर्जुन कोटनाके, सरपंच गंगाधर पंधरे, लटारी ताजणे, सुधाकर कुसराम, खोके, संतोष पावडे, लोहे, लक्ष्मण राजुरकर, नागोबा टेकाम, देवतळे, विलास राजूरकर, आगलावे, लिलाधर चटप, यशवंत मुसळे, चरणदास कोट्टे, किसन अवताडे, चंद्रकांत झुरमुरे प्रामुख्याने उपस्थित होते. 
यावेळी बोलताना अ‍ॅड. चटप म्हणाले, शेतकरी व शेतीवर जगणारा गावातील प्रत्येक व्यक्ती हा माणूस आहे आणि त्याला माणूस म्हणून सन्मानाने व सुखाने जगता यावे, याकरिता शेती हा धंदा फायद्याचा होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व शेतमाल उत्पादनाचा खर्च भरून निघेल, एवढा रास्त भाव मिळाला पाहिजे. मालक व मजुराला घामाचे दाम मिळाले पाहिजे, यासाठी कच्चा व पक्का माल देशांतर्गत व देशाबाहेरील कोणत्याही बाजारपेठेत जेथे जास्त किंमत मिळेल, तेथे विकण्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. तरच शेतकरी कर्ज, कर व वीज बिल भरू शकतील. आतापर्यंत रास्त भाव न मिळाल्यानेच शेतकऱ्यांचे शोषण होऊन आत्महत्याचे सत्र सुरू झाले. 
                                 यावेळी मधुकर हरणे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात आवाळपूर, गाडेगाव, हिरापूर, सांगोडा, खिरडी या गावातील नवनिर्वाचित शेतकरी संघटना व स्वभापचे ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि सेवा सहकारी सोसायटीचे संचालक यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक व संचालन प्रभाकर दिवे यांनी केले. सभेला कोरपना तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्ते शेतकरी, महिला, युवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
(लोकसत्ता दि. १४-२-११ मधून साभार)

Saturday, February 12, 2011

शेतकरी आंदोलनाचे यश


                 सध्या देशांतर्गत खुल्याबाजारपेठेत कापसाच्या भावाने प्रती क्विंटल रू. ७०००/- एवढा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे कापूस उपादक शेतकर्‍यांना बर्‍यापैकी दिलासा मिळाला आहे.
"खुल्या अर्थव्यवस्थेत शेतकर्‍यांना चांगले भाव मिळू शकतील" हे शेतकरी संघटनेचे भाकित आणि याच दृष्टीकोनातून खुल्याअर्थव्यवस्थेचे समर्थन कापसाला मिळत असलेल्या भावामुळे सार्थ ठरत आहे.
               आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला तेजी असूनही जर केंद्र शासणाने कापूस निर्यात सुरू न ठेवल्यास किंवा निर्यातबंदी लादल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कापसाच्या तेजीचा फ़ायदा भारतीय शेतकर्‍यांना मिळणार नाही, हे हेरूनच शेतकरी संघटनेने महाराष्ट्रभर जिल्हापातळीवर 
"खबरदार, जर कापसाला निर्यातबंदी लागू कराल तर......!"
हे अभिनव आंदोलन छेडले होते. शिवाय शेगाव (जि. बुलढाना) येथे ४ तास रेल्वे रोकोही केले होते.
एकंदरीत आज कापसाला मिळत असलेले विक्रमी भाव हे निखळ शेतकरी आंदोलनाचे यश आहे.
आणि मुक्त अर्थव्यवस्थेतील शेतकर्‍यांचेही.  

Thursday, January 20, 2011

संभाजी ब्रिगेड-मनसे वादात शेतक-यांचे हित नाही


संभाजी ब्रिगेड-मनसे वादात शेतक-यांचे हित नाही
20 Jan 2011, 0416 hrs IST

म. टा. वृत्तसेवा  धुळे

         राज्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये मराठा समाजातील शेतकऱ्यांची संख्या जास्त असताना शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा, यासाठी संभाजी ब्रिगेड कधीच रस्त्यावर आली नाही. शिवाजी महाराजांचा कैवार घेतलेल्या या संघटनेला, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लावू नका अशी तंबी शिवरायांनी दिली होती, या गोष्टीचा विसर पडला आहे. संभाजी ब्रिगेडने एकदा बाजार समितीत शेतकऱ्यांची कशी लूट होते, हे बघून घ्यावे, असा सल्ला शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवि देवांग यांनी दिला आहे.

        संभाजी ब्रिगेड आणि मनसे यांच्या वादात बहुजनांचा आणि पिळवणूक होणाऱ्या मराठीभाषिक शेतकऱ्यांचा फायदा नाही. या अस्मितेच्या वादामुळे जनसामान्यांचे आथिर्क प्रश्न मागे पडतात. शहरातील ग्राहकांची चळवळ आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची चळवळ मागे पडते, असे देवांग यांनी खडसावले आहे. मराठा आणि मराठेतर अशी जातीय तेढ शेतकऱ्यांचाच चेंदामेंदा करणारी आहे. त्यात ४० टक्के शेतकरी मराठाच असतील. संभाजी ब्रिगेडने हा विचार विवेकपूर्व करावा, असे देवांग यांनी सुचवले आहे.
(महाराष्ट्र टाईम्स वरून साभार )
............................................................

Wednesday, January 19, 2011

कार्यकारीणीची बैठक

१८ जानेवारी २०११ ला अकोला येथे कार्यकारीणीची बैठक संपन्न झाली.



Thursday, January 13, 2011

आयबीएन-लोकमत चर्चा

स्टार TV-ब्लॉग माझा-Vdo



स्टार माझा TV-ब्लॉग माझा-
                      स्टार माझा TV द्वारा नोव्हेंबर-डिसेंबर २०१० मध्ये ब्लॉग माझा-३ या ब्लॉग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये जगाच्या कानाकोपर्‍यातून मराठी ब्लॉगर्सनी उत्स्फ़ुर्तपणे भाग घेतला होता. या स्पर्धेत माझ्या "रानमोगरा" या ब्लॉगला पुरस्कार मिळाला. या स्पर्धेचे निकाल जाहिर झाल्यानंतर २७ डिसेंबर २०१० रोजी स्टार माझाच्या मुंबई येथील स्टुडियोमध्ये बक्षिस वितरण समारंभ संपन्न झाला.
                    ब्लॉग माझा-३ स्पर्धेच्या कौतुक सोहळ्याचा समरंभाचे आणि बक्षिस वितरण कार्यक्रमाचे स्टार माझा TV वर दिनांक २७-०३-२०११ रोजी सकाळी ९ ते १० आणि दुपारी २ ते ३ वाजता प्रक्षेपण करण्यात आले.

रानमोगरा

............................................................................................
                                    दिनांक १४ डिसेंबर २०१० ला वर्धा येथील नामदेव सभागृहात शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांचे हस्ते, शेतकरी संघटनेचे प्रांतीय अध्यक्ष श्री रवीभाऊ देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड.वामनराव चटप, माजी आमदार सरोजताई काशीकर यांचे प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला.
कार्यक्रमाचा वृतांत पाहण्यासाठी आणि मा. शरद जोशी व मान्यवरांचे भाषण ऐकण्यासाठी क्लिक करा.


......

......


......

......


............................................................................................


आयबीएन-लोकमत चर्चा


                  
दि.१२-०१-२०११ ला आयबीएन-लोकमत वाहिनीवर ’आजचा सवाल’ या कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या "वाढत्या महागाईसमोर सरकार हतबल झालंय का?” या विषयावर चर्चा करण्यात आली. चर्चेत शरद जोशी, हेमंत देसाई, प्रा. संजय चपळगांवकर आणि अजित अभ्यंकर यांनी भाग घेतला. त्याचर्चेचे मुख्य अंश....






............................................................................................

नागपुरी तडका - अभिवाचन

1) बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका


............................................................................................
.
2) छातीचं झाकण आता बोम्लीवर आलं : नागपुरी तडका





............................................................................................

1)  मेथीची भाजी-शिवा



............................................................................................

2)  कोंबडी पळाली तंगडी धरून-शिवा



............................................................................................