संपादकीय

मनोगत


नमस्कार,
                शेतकरी चळवळीशी निगडित बातम्या जगभरातील कोणत्याही व्यक्तीला हव्या तेव्हा वाचायला उपलब्ध व्हाव्यात ही माफ़क अपेक्षा ठेवून हा अंक आंतरजालावर प्रकाशित करताना आनंद होत आहे. त्यासोबतच या माध्यमातून आपल्याला शेतकरी संघटनेच्या विचाराचा प्रसार करता आला तर ते मौलिक कार्य ठरू शकेल. शिवाय शेतकर्‍यांच्या युवा पिढीत नवे गणकशास्त्रीय तंत्रज्ञान रुजविण्यासही बर्‍यापैकी हातभार लागू शकेल. अशाच काहीशा अपेक्षेने या अंकाचे प्रयोजन.
ग्रामीण जीवनाच्या वास्तवदर्शी कविता, लेख, कथा सुद्धा या अंकात प्रकाशित करता येईल.
त्यामुळे सर्वांना विनंती की महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात शेतकरी चळवळीशी निगडित वृत्तांत, संघटनात्मक कार्यक्रम, मेळावे, आंदोलन या संबधित बातम्या पाठवाव्यात.

बातमी कशी पाठवायची?
१) ई-मेलव्दारा
जीमेलच्या पानावर मराठीत टाईप करून, फ़ोटो असल्यास सोबत अटॅचमेंट जोडून, वृत्तपत्राचे कात्रण/प्रेस नोट स्कॅनींग करून जेपीजी फ़ाईल फ़ॉरमॅट मध्ये  shetkarisanghatana@gmail.com  पाठवावी.
२) पोष्टव्दारा - 
कागदाच्या एकास बाजूस सुवाच्य अक्षरांत लिहून खालील पत्यावर पाठवावी. कुरीअर सर्व्हीसने पाठवू नये.

भरभरून सहकार्य मिळेल या अपेक्षेने.

या प्रयोगाचे यश तुमच्या प्रतिसादावर अवलंबून आहे.

पत्ता :-
गंगाधर मुटे
आर्वी छोटी - ४४२३०७
त. हिंगणघाट जि. वर्धा.
-----------------------------------------------------------------------