शेतकरी संघटनेतर्फे घटनेच्या प्रतिकात्मक प्रतीचे दहन
धुळे, दि.१४.०४.२०११
भारतीय राज्य घटना नव्या मनुस्मृतीचे रुप आहे. त्यातून शेतकर्यावर अन्याय झालेला आहे. असा आरोप करीत शेतकरी संघटनेतर्फे राज्य घटनेच्या परिशिष्ठ 9 च्या प्रतिचे प्रतिकात्म दहन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष रवी देवांग यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. शेतकरी संघटनेतर्फे सकाळी 11 वाजेच्या सुमारास परिशिष्ट 9 च्या प्रतीचे दहन करण्यात आले.
भारतीय राज्य घटना नव्या मनुस्मृतीचे रुप आहे. त्यातून शेतकर्यावर अन्याय झालेला आहे. असा आरोप करीत शेतकरी संघटनेतर्फे राज्य घटनेच्या परिशिष्ठ 9 च्या प्रतिचे प्रतिकात्म दहन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष रवी देवांग यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. शेतकरी संघटनेतर्फे सकाळी 11 वाजेच्या सुमारास परिशिष्ट 9 च्या प्रतीचे दहन करण्यात आले.
शेतकर्यांना कुठलाही लाभ मिळत नाही. याचे हेच कारण असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान पोलिसांनी या आंदोलन प्रकरणी 21 शेतकर्यांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक करुन त्यांची सुटका केली. घटनेतील पहिल्या दुरुस्ती (1952) अन्वये परिशिष्ट (9) नुसार शेतकर्यांना मालमत्ता संपादन करण्याचा मुलभूत अधिकार नाकारला आहे. मालमत्तेच्या व्यवहारांवर राज्यसत्तेचे नियंत्रण आले. शेतकरी नाममात्र मालक ठरला. घटनेतील दुरुस्ती (1955) अन्वये जीवनावश्यक वस्तु कायदा लादून शेतकर्यांच्या नैसर्गिक बाजारपेठांमध्ये हस्तक्षेप करुन, मालाचा भाव ठरविण्याचे स्वातंत्र शेतकर्यांना नाकारले आहे. त्यामुळे शेतकरी कायम कर्जबाजारी झाला. औद्योगिक विकास नियंत्रण कायद्याने (1951) लायसन्स परमीट कोटा राज्य आले. त्यामुळे उद्योजकतेच्या स्वातंत्र्यावर घाला येवून नोकरशाही व पुढारी यांचा भ्रष्टाचार बोकाळला व अण्णा हजारेंना खालीपिली आंदोलन करावे लागले. वहातूक नियंत्रण कायदा (1939) व फेरचरना (1988) द्वारे प्रवासी वहातुकीवर नियंत्रण आले. त्यामुळे पोलिसांना हप्ता वसुलीस रान मोकळे झाले. ही घटनाच भ्रष्टाचाराची जननी आहे.
नाफेड व कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यांमुळे लायसन्स धारक व्यापारी व मार्केट कमिटीचे पुढारी यांनी अब्जावधी रुपये कमावले. शेतकर्यांला गरीब, कर्जबाजारी व आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. जे निर्णय शेतकरी, उद्योजक, व्यापारी यांनी घ्यायचे ते दिल्लीतील पुढारी व नोकरशहा घेवू लागलेत. घटना दुरुस्ती (1976) अन्वये उदारमतवादी घटना समाजवादी करण्यात आली. हा बदल देशात आणीबाणी लागू असतांना केला. तो मोकळ्या वातावरणात केला नाही. भारतीय खाद्यान्न महामंडळ कायदा (1962) अन्वये घटनेने शेती मालाच्या किंमती पाडण्याचा कायदेशीर आधार देवुन गरीबी निर्माण करण्याचा कायखाना गेली साठ वर्षे अखंडपणे सुरु आहे. तेही या घटनेमुळेच. ही घटना खून केलेल्या खुन्यासही तुरुंगात व्यक्ति स्वातंत्र्याची जपणूक करीत आत्मसन्मान देते, मात्र शेतकरी, उद्योजक यांना गुन्हेगार ठरविते. या देशाला युगप्रवर्तक दिशा देणार्या ऐतिहासिक आंदोलनाला देशभक्त नागरिकांनी आशिर्वाद द्यावा, अशी विनंती करतो, असे देवांग यांनी म्हटले आहे.
घटनेच्या परिशिष्टातील नऊ प्रमुख कारणांमुळे आज दि. 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकर स्मृतीदिनी ही अन्यायकारक घटना नवमनुस्मृतीरुपी घटना प्रतीक रुपाने जाळून टाकत आहे. असे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. याप्रसंगी रवी देवांग यांच्या सोबत बळीराज्य संघटनेचे धुळे विभाग अध्यक्ष शांतूभाई पटेल, जळगाव व नाशिकचे अध्यक्ष कडूअप्पा पाटील, जगन्नाथ राजपूत गणेशपूर, ता. साक्री, मनोहर रामचंद्र पाटील कलमाडी, ता. शिंदखेडा, भटू तात्या अकलाडे देगाव, ता. साक्री, प्रकाश सिताराम पाटील तालुकाध्यक्ष धुळे, आत्माराम बळीराम पाटील कापडणे ता. धुळे, जयवंत यशवंत पाटील कापडणे ता. धुळे, माधव गंगाराम भदाणे उबर्टी ता. साक्री, भास्कर निंबा काकुस्ते शेनपूर ता. साक्री, शांताराम चिंधू गांगुर्डे देगाव ता. साक्री, दत्ताजीराव माधवराव बेडसे छडवेल कोर्डे ता.साक्री, धवळू पुंडलिक गांगुर्डे, श्रीराम गंगाराम ठाकरे, सजन कोंडाजी बहीरम, नारायण देवचंद देसले सर्व रा. देगाव ता. साक्री, पोपटराव शिवराम देवरे धमनार ता. साक्री, भिका खुशाल जाधव शेवाळी ता. साक्री, शिवाजी कृष्णा पाटील कापडणे ता. धुळे, गुलाबसिंग रघुवंशी सार्वे ता. शिंदखेडा आदी उपस्थित होते.
Mr: Kardak Nivrutti Baburao.
shetkari sanghatana
Kurnoli tal.Dindori [Nashik]
shetkari sanghatana
Kurnoli tal.Dindori [Nashik]
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आभार.
आपणास हा ब्लॉग असा वाटला या बद्दल अभिप्राय किंवा सुचना खालील चौकटीत लिहा.
आपले विचार आणि सुचना या ब्लॉगच्या जडणघडणीसाठी महत्वाच्या ठरू शकतात.
म्हणून
आपला प्रतिसाद अवश्य लिहावा.
ही कळकळीची आग्रहवजा विनंती.
आपला स्नेहाकिंत
गंगाधर मुटे