अभिनंदन सोहळा
दिनांक १४ वर्धा :
शेतकरी संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे यांना त्यांच्या "रानमोगरा - शेती आणि कविता" या ब्लॉगला स्टार माझा या लोकप्रिय मराठी वृत्तवाहिनीतर्फ़े घेण्यात आलेल्या जागतिक पातळीवरील मराठी ब्लॉग माझा स्पर्धेत पुरस्कार मिळाल्याबद्दल शेतकरी संघटनेच्यावतीने शाल आणि श्रीफ़ळ देऊन सत्कार करण्यात आला.
दिनांक १४ डिसेंबरला वर्धा येथील नामदेव सभागृहात शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांचे हस्ते, शेतकरी संघटनेचे प्रांतीय अध्यक्ष श्री रवीभाऊ देवांग, स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अॅड.वामनराव चटप, माजी आमदार सरोजताई काशीकर, कैलासजी तंवर, शैलाताई देशपांडे, सुमनताई अग्रवाल यांचे प्रमुख उपस्थितीत सत्कार समारंभ पार पडला.
सभेला श्री जगदीशनाना बोंडे, विजय विल्हेकर, अरुण केदार, प्रा. झोटींग, मधुसुदन हरणे, तसेच भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर येथील प्रतिनिधी उपस्थित होते.
...................
कार्यक्रमाचा वृतांत पाहण्यासाठी आणि मा. शरद जोशी व मान्यवरांचे भाषण ऐकण्यासाठी क्लिक करा.......
......
......
......
.....
...............................................................................................