सध्या देशांतर्गत खुल्याबाजारपेठेत कापसाच्या भावाने प्रती क्विंटल रू. ७०००/- एवढा उच्चांक गाठला आहे. त्यामुळे कापूस उपादक शेतकर्यांना बर्यापैकी दिलासा मिळाला आहे.
"खुल्या अर्थव्यवस्थेत शेतकर्यांना चांगले भाव मिळू शकतील" हे शेतकरी संघटनेचे भाकित आणि याच दृष्टीकोनातून खुल्याअर्थव्यवस्थेचे समर्थन कापसाला मिळत असलेल्या भावामुळे सार्थ ठरत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला तेजी असूनही जर केंद्र शासणाने कापूस निर्यात सुरू न ठेवल्यास किंवा निर्यातबंदी लादल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कापसाच्या तेजीचा फ़ायदा भारतीय शेतकर्यांना मिळणार नाही, हे हेरूनच शेतकरी संघटनेने महाराष्ट्रभर जिल्हापातळीवर
"खबरदार, जर कापसाला निर्यातबंदी लागू कराल तर......!"
हे अभिनव आंदोलन छेडले होते. शिवाय शेगाव (जि. बुलढाना) येथे ४ तास रेल्वे रोकोही केले होते.
एकंदरीत आज कापसाला मिळत असलेले विक्रमी भाव हे निखळ शेतकरी आंदोलनाचे यश आहे.
आणि मुक्त अर्थव्यवस्थेतील शेतकर्यांचेही.
No comments:
Post a Comment
ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आभार.
आपणास हा ब्लॉग असा वाटला या बद्दल अभिप्राय किंवा सुचना खालील चौकटीत लिहा.
आपले विचार आणि सुचना या ब्लॉगच्या जडणघडणीसाठी महत्वाच्या ठरू शकतात.
म्हणून
आपला प्रतिसाद अवश्य लिहावा.
ही कळकळीची आग्रहवजा विनंती.
आपला स्नेहाकिंत
गंगाधर मुटे