Thursday, January 20, 2011

संभाजी ब्रिगेड-मनसे वादात शेतक-यांचे हित नाही


संभाजी ब्रिगेड-मनसे वादात शेतक-यांचे हित नाही
20 Jan 2011, 0416 hrs IST

म. टा. वृत्तसेवा  धुळे

         राज्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये मराठा समाजातील शेतकऱ्यांची संख्या जास्त असताना शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा, यासाठी संभाजी ब्रिगेड कधीच रस्त्यावर आली नाही. शिवाजी महाराजांचा कैवार घेतलेल्या या संघटनेला, शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही धक्का लावू नका अशी तंबी शिवरायांनी दिली होती, या गोष्टीचा विसर पडला आहे. संभाजी ब्रिगेडने एकदा बाजार समितीत शेतकऱ्यांची कशी लूट होते, हे बघून घ्यावे, असा सल्ला शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रवि देवांग यांनी दिला आहे.

        संभाजी ब्रिगेड आणि मनसे यांच्या वादात बहुजनांचा आणि पिळवणूक होणाऱ्या मराठीभाषिक शेतकऱ्यांचा फायदा नाही. या अस्मितेच्या वादामुळे जनसामान्यांचे आथिर्क प्रश्न मागे पडतात. शहरातील ग्राहकांची चळवळ आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची चळवळ मागे पडते, असे देवांग यांनी खडसावले आहे. मराठा आणि मराठेतर अशी जातीय तेढ शेतकऱ्यांचाच चेंदामेंदा करणारी आहे. त्यात ४० टक्के शेतकरी मराठाच असतील. संभाजी ब्रिगेडने हा विचार विवेकपूर्व करावा, असे देवांग यांनी सुचवले आहे.
(महाराष्ट्र टाईम्स वरून साभार )
............................................................

No comments:

Post a Comment

ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आभार.
आपणास हा ब्लॉग असा वाटला या बद्दल अभिप्राय किंवा सुचना खालील चौकटीत लिहा.
आपले विचार आणि सुचना या ब्लॉगच्या जडणघडणीसाठी महत्वाच्या ठरू शकतात.
म्हणून

आपला प्रतिसाद अवश्य लिहावा.
ही कळकळीची आग्रहवजा विनंती.
आपला स्नेहाकिंत
गंगाधर मुटे